श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन

चिंबळी फाटा दि.१८ – दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यावश्यक असते. प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना अपेक्षेएवढे गुण मिळतातच असे नाही. कमी गुण मिळूनही करिअरच्या विविध वाटा विद्यार्थी निर्माण करू शकतात, या हेतूने चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘मोशन क्लिप्स’कडून करिअर विषयक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी ॲनिमेशन आणि फिल्म डिझाईन हा देखील करिअर करण्याचा एक उत्तम पर्याय असून या माध्यमातून आपणाला प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी प्राप्त करता येतात त्यासाठी जिद्द, चिकाटी व कल्पकता आपल्यात असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ‘मोशन क्लिप्स’ चे अध्यक्ष माननीय श्री.बाबासाहेब दिघे सर यांनी यावेळी केले. मोशन क्लिप्स चाकण या संस्थेद्वारे डिप्लोमा इन ॲनिमेशन अँड फिल्म डिझायनिंग व बीएससी इन ॲनिमेशन डिझाईन यांसारखे विविध कोर्स उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन आपले उत्तम करिअर करावे ,असे दिघे यांनी यावेळी सांगितले.श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री शिवाजीराव गवारे सर व सचिव मा. सौ.विद्याताई गवारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या प्राचार्या मा.सौ. अनिता टिळेकर, शिक्षिका श्रीमती तेजश्री लगड सौ. ललिता बडदे, सौ. नीलिमा डोंगरे,सौ.पूजा पगारे ,सौ.कानडे मॅडम, पर्यवेक्षिका सौ. सपना टाकळकर ,सौ. शोभा तांबे सौ. मोनाली मुंगसे ,श्री.निखिल कांबळे,सौ.दीपाली थोरात,श्री.सिद्धेश धोंडगे,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.