श्री समर्थ ग्रुप चे अध्यक्ष शिवाजी बबनराव गवारी यांना सन्मानित करताना हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले ज्येष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे, वेल्हा तालुक्याचे तहसिलदार श्री शिवाजीराव शिंदे, राजाभाऊ पासलकर आणि मान्यवर

शिवाजी गवारे मावळा गौरव पुरस्काराने सन्मानित.
जिजाऊ जन्मोत्सवात राजगड पायथ्याला कार्यक्रम.

श्री समर्थ ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष शिवाजी बबनराव गवारे यांना यंदाचा अतिशय सन्मानाचा असलेला राष्ट्रीय पातळीवरील मावळा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मावळा जवान संघटनेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला असून गवारे यांचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक क्षेत्रामध्ये असलेल्या भरीव कामगिरीबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री भाऊसाहेब ढोले यांच्या शुभहस्ते गवारे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी मनपाचे उपायुक्त रमेश शेलार,वेल्हेचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, कोल्हापूर येथील शिवकन्या प्रतिष्ठानचे किरण गुरव,सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर ,सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज संजय कंक, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज ऋषिकेश गुजर,राष्ट्रसेवा समुहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, सुनिल राजेभोसले, संतोष शिवले, दत्तात्रय पाचुंदकर, गणेश राऊत, सरपंच निता खाटपे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, नानासाहेब शिळीमकर, शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ आदी उपस्थित होते.