राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी राजगडावर गर्दी

कर्तृत्ववानांचा गौरव; राज्यासह देशभरातून मावळ्यांची उपस्थिती

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना ४२५ व्या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी मानवंदना देण्यासाठी आज गुरुवारी (दि. १२) राजगडाच्या पायथ्याला पाल बुद्रुक (ता. वेल्हे) येथील मावळा तीर्थावर मावळ्यांचा जनसागर लोटला होता. जिजाऊंना वंदन करण्यासाठी राज्यासह देशभरातील महिला, जिजाऊभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ढोल-ताशा, तुतारीच्या निनादात व जिजाऊ, शिवरायांच्या जयघोषाने राजगडाची दरीखोरी दुमदुमून गेली. देशभरातील विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

परिवाराच्या वतीने जन्मोत्सवाचे आयोजन केले होते. हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे पारंपरिक रिवाजात पूजन करून मानवंदना देण्यात आली.
रायरेश्वराचे शिवाचार्य सुनील स्वामी जंगम प्रारंभ झाला. पहाटे हनुमंत दिघे व शिवाजी भोरेकर यांच्या हस्ते राजगड पूजन करण्यात आले. प्रास्ताविक इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी केले. कर्नल सुरेश पाटील, वेल्हेचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, सरसेनापती वीर बाजी पासलकर यांचे वंशज राजाभाऊ पासलकर, सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज संजय कंक, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज ऋषिकेश गुजर, सरपंच नीता खाटपे, शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ आदी उपस्थित होते.

शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर यांनी जिजाऊ, शिवराय यांच्या शौर्याचा इतिहास जिवंत केला. राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने शिरूर येथील जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर व बारामती येथील
लेखिका अर्चना सातव यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय मावळाभूषण पुरस्काराने चिंबळी येथील शिवाजी बबन गवारे, भोर येथील समीर घोडेकर व खेड येथील दिव्यांग उद्योजक अमोल चौधरी यांचा तसेच राष्ट्रीय गुणवंत खेळाडू पुरस्काराने आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संपन्न शेलार यांचा सन्मान करण्यात आला.

छत्रपती महाराणी ताराराणी गौरव पुरस्काराने कोल्हापूर येथील पूजा यमगर, शिवानी कोळी, साक्षी मोहिले यांचा व आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रा. कीर्ती जाधव, मधुबाला आदींनी केले.

प्राचार्य पांडुरंग पाटील यांचा सन्मान झाला. आदर्श सरपंच पुरस्काराने मेरावण्याचे सरपंच सत्यवान रेणुसे यांचा व राजगडावर चढाई करणाऱ्या तीन वर्षे वयाच्या आरोही रणखांबे हिच्यासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. राजगड-तोरणा भागांतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप करण्यात आले. सूत्रसंचालन संजय भिंताडे व शशिकांत जाधव यांनी केले.