श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचे १० वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे…!

कुरुळी दि.४ “श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ” संचलित ‘श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा’ विद्यालयाचे १०वे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार दिनांक ०१/०१/२०२३ रोजी भोसरी ता. हवेली, येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव मा.सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे यांनी दिली. सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच गुणवंत विद्यार्थी, गुणवंत शिक्षक, उत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट पालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. चिंबळी फाटा येथे गेली 13 वर्षांपासून श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज ज्ञानदानाचे कार्य करीत असून एकूण सात शाखांतून आज हजारो विद्यार्थी उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण घेत आहेत. सध्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उज्वल करावे, असे श्री समर्थ शिक्षण प्रसार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव बबनराव गवारे यांनी यावेळी सांगितले. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमास मोई गावचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. बबनराव गवारे, श्री समर्थ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.अमोल गवारे, शाखा व्यवस्थापक मा.श्री. अर्जुन जाधव ,मा. श्री.प्रदीप लांडगे श्री.दत्ताशेठ लोखंडे,संचालिका सौ. सुनीताताई नाटक,उद्योजक श्री.उमेश येळवंडे ,उद्योजक श्री.विकास पवळे ,श्री समर्थ बस संघटना अध्यक्ष श्री.संतोषशेठ गवारे व सर्व बस संघटना कर्मचारी, संचालक मंडळ, सर्व शाखांचे मुख्यद्यापक, सर्व हेड मेंबर तसेच श्री समर्थ पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय जबाबदारी ,ध्येय निश्चिती, राष्ट्रप्रेम या समाजमन घडवणाऱ्या विषयांवर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर यांनी केले तसेच सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थी व उपशिक्षिका सौ.तेजश्री लगड यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात बालचमुनीं हिंदी,मराठी गाण्यावर ठेका धरत उपस्थितांची दाद मिळवली. उत्तम नियोजन, आकर्षक विद्युत रोशनाई, आकर्षक सजावट, विद्यार्थ्यांची गाण्याला साजेशी वेशभूषा, प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर दिलेली मनमुराद दाद ,प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले सभागृह यामुळे कार्यक्रम अधिकच बहरत गेला. विद्यालयाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे ‘उत्कृष्टतेचे पुरस्कार’ विद्यालयातील खालील कर्मचारी व विद्यार्थी यांना प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
सौ.ललिता दशरथ बडदे (उच्च माध्यमिक)
सौ. स्नेहल तुषार विधाते (माध्यमिक)
कु.सुरज नरसिंग सोमवंशी (प्राथमिक)
सौ. दिपाली विनोद कदम (पूर्व प्राथमिक)
उत्कृष्ट लिपिक पुरस्कार
श्री.धोंडगे सिद्धेश्वर आत्माराम
सौ.थोरात दिपाली चंद्रकांत
उत्कृष्ट योगदान पुरस्कार
श्री. थोरात अजित सिताराम

गुणवंत विद्यार्थी पुरस्कार
कु.साईराज राम म्हाळशिकर
कु.ज्ञानदा धनंजय करपे
कु.गौरी गिरीश फडकर
कु.असद रशीद चौगुले
कु. पायल रोहित गायकवाड
कु.सृष्टी प्रकाश वाडेकर

उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
कु.तन्मय मनोज बागडे
कु.सन्मित सिताराम मिसाळ
कु.ललित मोहनलाल चौधरी
कु.हर्षिता राहुल बेनके
कु.श्रेयस विजय सावंत
कु.कोल्हे अभिषेक भगवान

उत्कृष्ट पालक पुरस्कार
श्री. विलास दत्तात्रय बनकर व सौ. शुभांगी विलास बनकर
श्री.गणेश गांगुर्डे
तसेच कार्यक्रम प्रसंगी केलेल्या उत्तम सदारीकरणामुळे कराटे प्रशिक्षक कु. प्रशांत तांबे व मल्लखांब प्रशिक्षक श्री.दयानंद पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
विद्यालयातील सांस्कृतिक विभाग,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम योग्यरीत्या पार पडला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.