मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी पै. खंडू वाळूंज यांची निवड

लोणावळा :- मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र चॅम्पियन व मावळ केसरी पै. खंडू बबन वाळूंज यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन व मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष पै.चंद्रकांत सातकर व ऑलिंपियन कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. मारुती आडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हि निवड करण्यात आली.
मावळ तालुका कुस्तीगीर संघाची विषेश सभा पै. चंद्रकांत सातकर यांच्या अध्यक्षतेखाली कान्हे फाटा येथील तनिष्का हॉटेल येथे घेण्यात आली. यावेळी कुस्तीगीर संघाचे विद्यमान अध्यक्ष ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी पै. खंडू वाळूज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै.चंद्रकांत सातकर, ऑलिंपियन कुस्तीगीर व शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित पै. मारुती आडकर, राष्ट्रीय कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संभाजी राक्षे, राष्ट्रीय कुस्तीगीर व कुस्तीगीर संघाचे सचिव पै. बंडू येवले, महाराष्ट्र चॅम्पियन पै. तानाजी कारके, पै. मनोज उर्फ मनोहर येवले, पै. धोंडिबा आडकर, पै. सुरेश उर्फ मामू आगळ, पै. शिवाजी येवले, पै. चंद्रकांत तांबोळी आदी जण उपस्थित होते.यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष पै. खंडू वाळूंज म्हणाले, ‘मावळच्या व मावळ तालुक्यातील नवोदित कुस्तीगीरांच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन वेगवेगळे क्रीडात्मक धोरण व संकल्पना राबवून कुस्ती व कुस्तीगीरांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जाईल.