श्री समर्थ स्कूल च्या विद्यार्थ्याची राज्य स्तरीय किक- बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

काल दि.२१/१२/२०२२ रोजी अहमदनगर येथे पार पडलेल्या विभागस्तरीय किक-बॉक्सिंग क्रीडा प्रकारात श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मधील विध्यार्थी कु.तन्मय मनोज बागडे (इ.८वी) याने उत्कृष्ट खेळी करत विभागस्तरावर १४ वर्षाखालील ४७ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक(Gold medal) पटकावला.अशा खेळाडूचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री .शिवाजीराव गवारे सर,सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम,सर्व संचालक मंडळ, श्री समर्थ पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर ,वर्ग शिक्षक आणि सर्व क्रीडा शिक्षक तर्फे हार्दिक अभिनंदन…

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा…