श्री समर्थ पतसंस्थेच्या कालदर्शिकाचे प्रकाशन शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या हस्ते

सोळू ता.खेड येथे श्री समर्थ पतसंस्थेच्या कालदर्शिकाचे प्रकाशन शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या हस्ते करण्यात आले.श्री समर्थ पतसंस्थेच्या सर्व सभासदांना प्रथा परंपरा प्रमाणे कालदर्शिका मोफत वाटप करण्यात येते. चिंबळी फाटा, निघोजे, खालुम्ब्रे, सोळु आधी ठिकाणच्या संस्थेच्या शाखांच्या सभासदांना तसेच ग्रामस्थांना संस्थेच्या वतीने मराठीतील कालदर्शिका मोफत वितरित करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे मुख्य व्यवस्थापक अमोल गवारे,सोळू शाखा व्यवस्थापक प्रदीप लांडगे यांनी दिली.
याप्रसंगी शिवसेना नेते आमदार सचिन आहेर, जिल्हाप्रमुख माऊली कटके खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे शिवसेना नेते अशोक खांडेभराड माजी पंचायत समिती उपसभापती अमोल पवार, उपतालुका प्रमुख किरण गवारे, संस्थेचे सोळु शाखा संचालक भानुदास गोडसे, महेश ठाकुर सल्लागार विठ्ठल ठाकुर, नाना गोडसे, ज्ञानेश्वर ठाकुर आदी मान्यवरांच्या हस्ते कालदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले