फुगेवाडी माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

(फुगेवाडी) – पिं,चिं, महानगरपालिका फुगेवाडी माध्यमिक विद्यालय मधील सन 1998 -99 च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी व शिक्षक 23 वर्षानंतर स्नेहसंमेलन कार्यक्रमात एकत्र भेटले, यावेळी शालेय जीवनातील अविस्मरणीय सोनेरी आठवणींना उजाळा मिळाला, या मेळाव्यास 55 माजी विद्यार्थी व 15 शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि सध्याचे मुख्याध्यापिका हे सर्व उपस्थित होते सर्व शिक्षकांना शाल ,श्रीफळ, तुळशीवृंद, व महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला , जे शिक्षक काही कारणास्तव आले नाही त्यांची घरी भेट घेऊन सन्मान करण्यात आला ,
माजी विद्यार्थी ज्योत्स्ना देवकर , अंजली खंडारे, रत्नमाला गव्हाणे, सलीम मुल्ला, संदीप वाखारे, संजय आरे यांनी शालेय जीवनातील सुखद मनोगत व अनुभव व्यक्त केले तसेच मान्यवर अध्यक्ष पाईकराव सर व शिक्षक श्री एकशिंगे सर, पाटील सर , भिसे सर ,पटेल मॅडम, पाटील मॅडम काकडे मॅडम, बघाडे मॅडम या सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शनातून प्रेरणा दिली ही प्रेरणा अविस्मरणीय आमच्या हृदयात साठवून राहील , तसेच इनामदार मॅडम काही कारणास्तव आले नसले तरी सर्व विद्यार्थी व शिक्षक क्षणोक्षणी त्यांची आठवण काढत होते ,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व विशेष आभार विक्रम नाणेकर यांनी व्यक्त केले व श्री सुधीर गव्हाणे, नागेश फुगे ,उमेश जाधव ,विजय शिवशरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेतू उद्देश व संवाद , सांस्कृतिक कला व नृत्य सहभागी करून कार्यक्रमात रंगत आणली, शिवा डिगीकर, आरिफ शेख, मयूर व अक्षय पुंडे, फैयाज शेख , इक्बाल खान, किरण जाधव, संतोष सूर्यवंशी ,अब्बास शेख, इस्माईल शेख ,हाजी शेख ,जब्बार दुधनी,रमेश बंगारी, सतिश सोनवणे, गिरीश पाटील,इम्तियाज शेख,विजय रेवणे,तुषार फुगे
यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले
इतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची नावे आली नसली तरी कार्यक्रमात आनंदी, उत्साही झाले होते,

फुगेवाडी माध्यमिक विद्यालय स्नेहसंमेलन प्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षक सोहळा