श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा दि.२६ नोव्हेंबर 2022 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज,चिंबळीमध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. शिवाजीराव गवारे सर व संस्थेच्या संस्थापिका सौ.विद्याताई गवारे मॅडम तसेच शाळेच्या प्राचार्य सौ.अनीता टिळेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन पार पाडण्यात आला.
संविधान दिनानिमित्त यावेळी संविधानाचे जनक असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी हिंदी तसेच इंग्रजी भाषेमध्ये संविधानाचे वाचन केले, काही विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व सांगणारे वकृत्व यावेळी सादर केले तसेच संविधानाविषयीचे गीतही सादर करण्यात आले.कार्यक्रमांमध्ये पुढे महाविद्यालयातील शिक्षिका वर्षा दिघे मॅडम यांनी संविधान दिन का साजरा केला जातो? तसेच त्याचे महत्त्व काय आहे? आजच्या पिढीने संविधान म्हणजे काय हे का जाणून घेतले पाहिजे? याविषयी आपले मत मांडले. कार्यक्रमासाठी यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.शोभा तांबे मॅडम सौ. मोनाली मुंगसे मॅडम, सौ.सपना टाकळकर मॅडम, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख रूपाली नाकट मॅडम, मनिषा खराबी मॅडम,राधा सोंडगे मॅडम,योगिता पाटील मॅडम, कोकणे मॅडम,वर्षा जाधव मॅडम, स्मिता नलगे मॅडम, सुवर्णा मॅडम आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येथे उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त पटले मॅडमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणामध्ये संविधान दिन हे अक्षर तयार केले.अशा प्रकारे मानवाला जगण्याचा अधिकार व मूलभूत हक्क देणारा हा संविधान दिन श्री समर्थ स्कूल व कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले होते तर या कार्यक्रमाला श्री सुरत सोमवंशी सर, अजित सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.