कामगारनेते संतोष शिंदे यांच्या स्मृती जागवल्या

निघोजे येथील कै.संतोष भाऊ सोपान शिंदे उद्योग नगरीचे युवा उद्योजक आणि भैरवनाथ लॉजिस्टिक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि अनेक कामगारांचे कामगार नेते म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवला होता त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या अस्थी महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेनुसार कुटुंबीयांनी नदीपात्रात न करता सोडता झाडे लावून स्मृति जागृत ठेवल्या.

याप्रसंगी मोठ्या संख्येने  ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी  त्यांच्या आई, माजी जिल्हा परिषद सदस्य शिलाताई शिंदे व कांचनताई शिंदे , हिरामण शिंदे,निवृत्ती शिंदे,गणपतराव शिंदे, नामदेव शिंदे, धनंजय मोरे, कैलास येळवंडे, आबू येळवंडे, बाळू शिंदे, किरण पानसरे, शिंदे,संतोष येळवंडे, सागर येळवंडे, रमेश खाडेभराड,  विजय येळवंडे, अनिल शिंदे, प्रमोद कोळेकर, तानाजी शिंदे, सुदाम आरूडे, विग्नेशवर येळवंडे, अशोक येळवंडे, भोर मामा, संभाजी शिंदे, जालिंदर नाणेकर, तसेच शिंदे परिवार उपस्थित होते.