श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला व मुलींसाठी आरोग्य विषयी सेमिनार व साहित्य वाटप.

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला व मुलींसाठी आरोग्य विषयी सेमिनार व साहित्य वाटप.

मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, चिंबळी फाटा येथे संस्थेचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव गवारे सर व संस्थेच्या संस्थापिका सौ. विद्याताई गवारे मॅडम , प्राचार्य सौ.अनिता टिळेकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व यश फाउंडेशन, चाकण यांच्या संयुक्त विद्यामानाने विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शक सेमिनार व साहित्य वाटप ठेवण्यात आलेले होते.यावेळी कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून अनिरुद्ध हॉस्पिटलच्या डॉ.अनुप्रिया इघे मॅडम,चंदा थेटे मॅडम,रेणुका भावसार मॅडम,धीरज पाटील सर, शाळेच्या पर्यवेक्षिका तांबे मॅडम,मुंगसे मॅडम विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका याठिकाणी उपस्थित होत्या.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचा सत्कार करून करण्यात आली.त्यानंतर विद्यालयातील इयत्ता 5वी ते 10वी च्या मुलींना डॉक्टर अनुप्रिया मॅडम यांनी आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले.आपल्या मनोगतामध्ये डॉ.अनुप्रिया मॅडम यांनी मुलींना मासिक पाळी म्हणजे काय? मासिक पाळीच्या कालावधीमध्ये कोणते त्रास होतात? त्यावर उपाय म्हणुन काय खबरदारी घ्यावी हे त्यांनी यावेळी सांगितले.आपल्या व्याख्यानामध्ये त्यांनी सकस आहार कोणता आहे.शरीर स्वस्थ राहण्यासाठी काय पथ्य पाळावे? काय खावे काय खाऊ नाही इ.वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी सर्व मुलींना मार्गदर्शन केले.सर्व मुलींनी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.मुलींच्या वेगवेगळ्या प्रश्न व समस्यांचे निराकरण डॉ.अनुराधा मॅडम यांनी यावेळी केले.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व यश फाउंडेशन तर्फे यावेळी शाळेला दोन वॉटर फिल्टर व मुलींसाठी सॅनिटरी पॅड देण्यात आले.शाळेच्या प्राचार्या सौ.अनिता टिळेकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.