श्री समर्थच्या विद्यार्थ्यांचे ‘मल्लखांब’ प्रात्यक्षिक

पुणे दि.५ भारत सरकार रक्षा मंत्रालय,पुणे अंतर्गत विविध साहसी कार्यक्रमाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या मुलांनी मल्लखांब व योगासने यांची प्रात्यक्षिके करून दाखवत उपस्थित आर्मी जनरल मॅनेजर, आर्मी ऑफिसर, इतर अधिकारी वर्ग व उपस्थितांची मने जिंकली.सदर प्रात्यक्षिक दाखवत असताना शरीरयष्टी लवचिक व पिळदार कशी असावी याचे उत्तम उदाहरण त्यांनी इतरांन समोर ठेवले. श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचे मल्लखांब मुख्य प्रशिक्षक श्री.दयानंद पाटील आणि सहकारी सुरज सोमवंशी यांनी करून घेतली. यावेळी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचा सन्मान करण्यात आला. सदर सन्मान स्कूल अँड कॉलेजच्या वतीने उपस्थित शिक्षक व मुलांनी स्वीकारला..