श्री समर्थांच्या विद्यार्थ्यांची ‘हाफ-कीडो बॉक्सिंग’ या क्रीडा प्रकारात सुवर्णमय कामगिरी.

श्री समर्थांच्या विद्यार्थ्यांची ‘हाफ-कीडो बॉक्सिंग’ या क्रीडा प्रकारात सुवर्णमय कामगिरी.
खराबवाडी दि.९- महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण विभाग व हाफ- किडो बॉक्सिंग असोसिएशन,अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘राज्यस्तरीय ‘हाफ-कीडो बॉक्सिंग’ची स्पर्धा अहमदनगर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत खराबवाडी (चाकण )येथील श्री समर्थ स्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 14 गोल्ड, 8 सिल्वर व 1 ब्राँझ पदकांची लयलूट करत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला. मुलांमध्ये दीपक यादव या विद्यार्थ्याची बेस्ट फायटर म्हणून तर मुलींमध्ये अफिफा मलिक या विद्यार्थिनीची बेस्ट फायटर म्हणून निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी पुणे संघाचे नेतृत्व श्री समर्थ विद्यालयाने केले. या गुणवंत खेळाडूंची चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्या मा. विद्या पवार यांनी दिली. पदक प्राप्त गुणवंत खेळाडू खालील प्रमाणे आहेत:-
सुवर्ण पदक ????????????
राधिका पवार – सुवर्ण पदक
आफिफा मलिक – सुवर्ण पदक
सुप्रिया जमबुकर – सुवर्ण पदक
राजलक्ष्मी गुळवे – सुवर्ण पदक
सुमित तिवारी – सुवर्ण पदक
नितेश यादव – सुवर्ण पदक
सोहम शिंदे – सुवर्ण पदक
दीपक यादव – सुवर्ण पदक
सुयश वाघमारे – सुवर्ण पदक
प्रणव पाटील – सुवर्ण पदक
प्रथमेश देशमुख – सुवर्ण पदक
अजय यादव – सुवर्ण पदक

???? ???? ????
फरहाना मलिक – रौप्य पदक
रोहन धनले – रौप्य पदक
प्रेम काळे – रौप्य पदक
आदर्श सिंग – रौप्य पदक
समर्थ वाळके – रौप्य पदक
युदो ( technical fight) ????
सुवर्ण पदक ???? ????
अफिफा मलिक – सुवर्ण पदक
सोहम शिंदे – सुवर्ण पदक

रौप्य पदक ???????? ????
प्रेम काळे – रौप्य पदक
समर्थ वाळके – रौप्य पदक
फरहाना मलिक – रौप्य पदक

कांस्य पदक ????
अजय यादव – कांस्य पदक

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार निलेश लंके यांच्या सौभाग्यवती मा.सौ.राणीताई लंके यांच्या शुभहस्ते गुणवंत खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्या मा.सौ. रेशमा पवार मॅडम व मा. श्री .संदीप पवार सर उपस्थित होते. खेळाडूंना मार्गदर्शन करणारे पुणे जिल्हा प्रमुख व राष्ट्रीय पंच श्री किरण पालकर सर प्रशिक्षक श्री.जयेश कसबे सर, श्री. प्रज्वल दाभाडे सर (राष्ट्रीय पंच ) त्याचप्रमाणे सर्व सहभागी व विजयी खेळाडू या सर्वांचे अभिनंदन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री. शिवाजीराव गवारे सर, सचिव विद्याताई गवारे मॅडम त्याचप्रमाणे प्राचार्या मा.सौ.अनिता टिळेकर, मा. सौ अश्विनी देवकर मा. सौ. सपना टाकळकर ,वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , श्री समर्थ बस संघटना व सर्व पालक यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.