श्री समर्थ स्कुल व कॉलेज, खराबवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचे बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश

श्री समर्थ स्कुल व कॉलेज, खराबवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांचे  बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश .

बारावी क्रीडा बारावी क्रीडा बॉक्सिंग पुणे शहर निवड चाचणी स्पर्धा 2022 आज पुणे खराडी येथे पार पडली. यात श्री समर्थ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खराबवाडी शाखेच्या सर्व बॉक्सिंग खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनी केली उत्कृष्ट कामगिरी.एकूण पंधरा मेडल मुलांनी जिंकले.त्यात एकूण आठ गोल्ड मेडल, तसेच चार सिल्वर मेडल, तीन ब्रांज असे एकूण १५ मेडल जिंकून मुलांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. ती पुढील प्रमाणे.

मुले :-

प्रणव पाटील -गोल्ड, प्रेम काळे- सिल्वर, रोहन धनले – गोल्ड, अजय यादव  – ब्रांज, दीपक यादव – गोल्ड, सुयेश वाघमारे – ब्रांज, प्रथमेश देशमुख- गोल्ड, साई मांढरे.     –  गोल्ड, सुमित तिवारी  – ब्रांज, नीतीश यादव – सिल्वर

मुली :-

अफिफा मलिक – गोल्ड, राधिका पवार  – गोल्ड, राजलक्ष्मी गुळवे –  सिल्वर, सुप्रिया जम्बुकर – सिल्वर, फराना मलिक -गोल्ड

संस्थेचे अध्यक्ष मा. श्री शिवाजी गवारे सर, सचिव सौ. विद्याताई गवारे मॅडम, प्राचार्या सौ.विद्या पवार, पर्यवेक्षिका सौ. अश्विनी देवकर, सौ रेश्मा पवार मॅडम, सहशिक्षिका मनीषा लामखेडे तसेच उत्कृष्ट क्रीडा शिक्षक व बॉक्सिंग कोच मा. श्री जयेश कजबे सर तसेच उत्कृष्ट बॉक्सिंग कोच मा. श्री प्रज्वल दाभाडे सर, क्रीडा शिक्षक  श्री सागर गाडे सर या सर्वांनी मुलांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुलांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.