श्री समर्थ स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पोलीस पथकाकडून मार्गदर्शन.

श्री समर्थ स्कूल आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पोलीस पथकाकडून मार्गदर्शन.
आज दि.२२/०९/२०२२ रोजी श्री समर्थ स्कूल आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व कायद्याची माहिती देण्यासाठी महाळुंगे पोलीस स्टेशन मधून श्री आर. डी.धादवड पोलीस हवालदार ४६६ बॅच नं. व किरण सांगळे पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस निरीक्षक श्री सोनवणे, पी सी श्री कांबळे पीसी होमगार्ड श्री मलघे होमगार्ड श्री कोळेकर या सर्वांनी पेट्रोलिंग दरम्यान श्री समर्थ स्कूल व कॉलेजच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भेट दिली व सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांना बाईक वापरण्याचे नियम ,गणवेश वापरणे ,केसांची स्टाईल इ. वर माहिती दिली. तर विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना वेळेवर शाळेत येणे .रस्त्यात, शाळेत किंवा इतर कोठेही काही अनुचित प्रकार घडला तर 112 नं. वर फोन करा तुम्हाला १५ मिनिटात पोलिसांची मदत मिळेल असेही सांगितले .या भेटीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार शाळा व कॉलेजमध्ये घडलेला नाही. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे सर सचिव सौ विद्याताई गवारे मॅडम व प्राचार्या सौ अनिता टिळेकर मॅडम यांनी आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वागत केले व वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी येण्यास सांगितले