पुणे, दि. 20, पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व राजगुरुरत्न पुरस्कार खेड

पुणे, दि. 20, पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व राजगुरुरत्न पुरस्कार खेड येथे झालेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार मध्ये चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मधील सौ.बडदे ललिता दशरथ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला ही वार्ता त्यांचे शिक्षक मा.श्री.सुदाम शिंदे (सहसचिव पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) समजल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला आपल्या विद्यार्थिनीला गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला याचा त्यांना अभिमान वाटला व विद्यार्थिनीचे कौतुक करण्यासाठी मा.श्री . सुदाम शिंदे व श्री दशरथ बडदे यांना श्री समर्थ स्कूल ला भेट देऊन पुरस्कार प्राप्त सौ. बडदे ललिता दशरथ यांच्या सह सौ.पटले वैशाली मोहन व सौ.विधाते स्नेहल तुषार या गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा त्यांनी सत्कार केला या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष माननीय श्री.शिवाजीराव गवारे सर व मा.सचिव विद्याताई गवारे मॅम व प्राचार्य सौ अनिता टिळेकर मॅम यांच्यासह पर्यवेक्षिका सौ शोभा तांबे, सौ मुंगसे मोनाली व शाळेतील इतर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.श्री समर्थ स्कूल च्या वतीने सौ अनिता टिळेकर मॅम यांनी श्री . सुदाम शिंदे यांचा स्मरणिका व सन्माचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मा. श्री. सुदाम शिंदे हे अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व असून सामजिक क्षेत्रामध्ये ते नेहमी अतिशय कार्यरत असे व्यक्तिमत्व आहे .तसेच नेहमी इतरांना सहकार्य करण्याची भावना व अभ्यासूवृत्ती या सगळ्या कौशल्यामुळेच त्यांना जिल्हास्तरीय दोन पुरस्कार व इतर एकूण 52 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सत्कार सोहळा पार पडल्या नंतर मा. सुदाम शिंदे सर यांनी सर्व शिक्षकांना इंग्रजी बोलण्या विषयी थोडक्यात मार्गदर्शन केले व पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.