पुणे, दि. १८, पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व राजगुरुरत्न पुरस्कार खेड

पुणे, दि. १८, पुणे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार व राजगुरुरत्न पुरस्कार खेड येथे रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात करण्यात आला. गुणवंत शिक्षक पुरस्कार चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मधील सौ.बडदे ललिता दशरथ , सौ.पटले वैशाली मोहन व सौ.विधाते स्नेहल तुषार या गुणवंत शिक्षकांसोबत पुणे जिल्यातील १७० गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच पंचायत समिती खेड चे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री. जीवन कोकणे सर यांसह पाच मान्यवरांना राजगुरू रत्न विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वरील सर्व शिक्षक हे शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र यामध्ये प्रशंसनीय कार्य करत आहेत. हे शिक्षक शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या आणि जनसेवेच्या कल्याणासाठी निस्वार्थीपणे अविरत कार्य करत असतात. या कार्याचा गौरव म्हणून खेड तालुक्याचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर संघाच्यावतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, पुणे जिल्हा अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, पदवीधर आमदार गणपती लाड, जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील, जि. प. सदस्य अतुल भाऊ देशमुख, शिक्षक आमदार मा.दत्तात्रय सावंत, मा.सुनंदा वाखारे,(शिक्षणाधिकारी, पुणे) मा.संजय नाईकडे (शिक्षणाधिकारी पिंपरी चिंचवड, मनपा) मा. अशोक भोसले (सचिव महाराष्ट्र राज्य परीक्षा विभाग पुणे) व खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षक केंद्र संघाचे अध्यक्ष मा.मधुकर नाईक कार्याध्यक्ष मा.उत्तमराव पोटवडे व सचिव मा.रामदास रेटवडे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. तसेच मा. भगवानराव साळुंखे शिक्षण (शिक्षक माजी आमदार) ,मा.जीवन कोकणे( गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खेड ),मा.राजकुमार राऊत (अध्यक्ष महाराणा प्रतिष्ठान), मा.प्रसादजी गायकवाड( पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव), मा. नंदकुमार सागर (अध्यक्ष मुख्याध्यापक संघ पुणे), मा. अरुण गणपत लाड (पदवीधर आमदार पुणे विभाग) या मान्यवरांनी उपस्थित सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून पुरस्कारार्थीच्या वतीने प्रवीण काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री समर्थ माध्यमिक विद्यालय चिंबळी फाटा येथील शिक्षकांना पुरस्कार प्रसंगी कौतुक करण्यासाठी व त्यांना सतत मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव गवारे सर व सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम तसेच संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता टिळेकर मॅडम व सहशिक्षक याप्रसंगी उपस्थित होते. सर्वांनी पुरस्कार प्रदान शिक्षकांचे अगदी मनापासून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.