श्री समर्थ स्कुल व कॉलेज, खालूंब्रे

श्री समर्थ स्कुल व कॉलेज, खालुम्ब्रे येथे शनिवार दि. १७/९/२०२२ रोजी समाज सहाय्कांचा कार्यक्रम उस्ताहात पार पडला. या वेळी शाळे मधल्या  मुलांनी डॉक्टर, पोलीस, समाज सेवक, नेता, विविध अधिकारी म्हणजेच समाजाच्या दैनदिन गरजासाठी उपयोगी असलेल्या प्रतिनिधीची भूमिका या वेळी पार पाडली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री चेतन पाचपुते व त्यांच्या पत्नी सौ. पूर्वा पाचपुते हजर होते. ज्या  विद्यार्थी विविध भूमिका साकारल्या त्यांना पाचपुते दाम्पत्याच्या वतीने शालेय उपयोगी साहित्य भेट दिले. या वेळी मुख्याध्यापिका वंदना यादव, दीपक देवकर सर, श्री समर्थ पतसंस्थेचे गोविद गवारे साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा निखाडे व शुभांगी बोत्रे यांनी केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्याताई गवारे व संस्थेच्या सर्व  पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आभार सारिका कदम यांनी मानले.