श्री समर्थ स्कूल व कॉलेज खराबवाडी येथे शिक्षक दिन उत्सहात साजरा

श्री समर्थ स्कूल व कॉलेज खराबवाडी या शाळेत शिक्षक दिन उत्सहात साजरा करण्यात आला. या वेळी आयडीएफसी  फर्स्ट बँक शाखा चाकण या बँकेचे महाराष्ट्र रिजनल झोन ग्राहक रिलेशनशिपचे हेड  पुनीत साहेब व चाकण शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या वेळी संस्थेच्या वतीन मा. अध्यक्ष शिवाजीराव गवारे  सचिव विद्याताई गवारे, प्राचार्या विद्या पवार, पर्यवेक्षिका अश्विनी देवकर, हसीना मणियार, सुरेखा पडवळ  सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात भारतचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून केली.

या वेळी पुनीत साहेबांनी शालेय जीवनातले अनुभव सांगितले शिक्षकाविषयी आपल आदर भाव व्यक्त केला. व काही शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बँकेतील अधिकारी यांनी सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन शिक्षक दिनाच्या

शुभेच्छा दिल्या. या सर्व अधिकाऱ्यांचे स्कूलच्या वतीने वृक्ष देऊन स्वागत केले. या सर्वांचे आभार प्रा. सागर गाडे यांनी केले