श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या नऊ मुलांची भारतीय नेव्ही मध्ये सब लेफ्टनंट पदी भरती

श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या नऊ मुलांची भारतीय नेव्ही मध्ये सब लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. सदर वृत्त समजताच निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेला प्रथम येऊन भेट दिली. सदर विद्यार्थ्यांचा श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव बबनराव गवारे सर व स्कूल अँड कॉलेजच्या सचिव सौ विद्याताई गवारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील काळात त्यांनी अशीच गरुड भरारी घ्यावी व कुटुंबाचे आणि शाळेचे नाव देशात उंचवावे अशी सदिच्छा व्यक्त केली.

शाळेच्या मुख्यापिका सौ. अनिता टिळेकर मॅडम यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत भविष्यात आणखी यश संपादन करावे अशी अपेक्षा त्यांनी केली. सदर विद्यार्थ्यानी येणाऱ्या काळात अशीच गगन भरारी घ्यावी अशी आशा सर्व शिक्षकवृंद यांनी व्यक्त करत त्यांचे कौतुक केले