श्री समर्थ विद्यालयाने मोठ्या थाटात गणपती बाप्पाचे विसर्जन केले

चिंबळीफाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजने मोठ्या थाटात गणपती बाप्पाचे विसर्जन केले. यावेळी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव बबनराव गवारे व श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या सचिव सौ.विद्याताई गवारे उपस्थित होते.अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसा पर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोशी व चिंबळी भागातील विविध स्तरावरील नामवंत व्यक्ती यांना आरती करिता बोलवण्यात आले होते यामध्ये सरपंच , नगरसेवक , डॉक्टर , वकील , पोलीस अधिकारी यांचा समावेश होता. श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता टिळेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख वर्षा दिघे, सौ.रुपाली नाटक व श्री.सुरज सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये मोदक बनवणे ,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गणपतीचे मुखवटे बनवणे , पाना – फुलांचा गणपती बनवणे , वक्तृत्व स्पर्धा,नृत्य स्पर्धा यांसारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.सपना टाकळकर, मोनाली मुंगसे व शोभा तांबे यांच्या यांच्या नियोजपूर्वक मार्गदर्शनामुळे सदर कार्यक्रम यशस्वी झाला.ढोल व ताशाच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी अगदी वाजत गाजत गणपती बाप्पाला निरोप दिला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ललिता बडदे , तेजश्री लगड, मिनाक्षी पाटील, वैशाली आहेराव , अश्विनी मेदनकर , ज्योत्स्ना बर्गे , मनिषा नवले, राधा सोंडगे,निकिता हजेरी , योगिता अरुडे, मयुरी उपासने, आम्रपाली शेळके तसेच निखिल कांबळे , सिध्देश्वर धोंडगे,अजित थोरात , रत्नाकर वाघमारे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रमोद रोकडे , इबितदार मामा यांनी श्रम घेतले.