राज्यस्तरीय शक्तीयुद्ध मार्शल आर्ट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

प्रतिनिधी – शक्ती रेसलिंग अँड क्रीडा वर्ल्ड कौन्सिल, वर्ल्ड मार्शल फेडरेशन (इंडिया) नोझोमी मार्शल आर्ट आयोजित चौथी आंतरशालेय राज्यस्तरीय शक्तीयुद्ध मार्शल आर्ट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ श्री समर्थ इंग्लीश मिङीयम स्कूल, खालुंब्रे, चाकण येथे पार पङला.

रविवार दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी पि.के. इंटरनॅशनल स्कूल, चाकण येथे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत खालुम्ब्रे येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत 16 गोल्ड, 11 – सिल्वर तर 19- ब्रॉन्झ पदक पटकावले असून उत्तम कामगिरी केल्यामुळे विद्यालयास विशेष प्राविण्यपदक सुद्धा मिळाले.

या पारितोषिक वितरण समारंभामध्ये विजेत्या स्पर्धकांना श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव बबनराव गवारे व संस्थापिका / सचिव मा. सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. यावेळी उद्योजक नितीन बो, प्राचार्या अनिता टिळेकर, विद्या पवार, वंदना यादव, पल्लवी कुटे, स्वाती सोनवणे इ. मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धकांना प्रशिक्षक प्रज्वल दाभाडे यांनी प्रशिक्षण दिले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी देवकर तर आभार प्रदर्शन अनिता टिळेकर यांनी केले