शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे,आर.एस.पी,स्काऊट गाईड व कॉलेजच्या मुला-मुलींनी खराबवाडी वाघजाई नगर चौक चाकण येथील महादेव मंदिराच्या डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण

५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री समर्थ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे आर एस पी, स्काऊट गाईड व कॉलेजच्या मुला मुलींनी खराबवाडी वाघजाई नगर चौक चाकण येथील महादेव मंदिराच्या डोंगर परिसरात दिनांक – ०३ सप्टेंबर २०२२, वार शनिवार रोजी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलं जवळजवळ 200 झाडं या ठिकाणी मुला मुलींनी लावून एक चांगला आदर्श आपल्या शिक्षकांसमोर ठेऊन खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजी गवारे सर तसेच संस्थेच्या सचिव माननीय सौ. विद्याताई गवारे मॅडम उपस्थित होत्या तसेच श्री समर्थ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खराबवाडी शाखेच्या माननीय सौ. प्रिन्सिपल मॅडम विद्या पवार मॅडम, तसेच पर्यवेक्षिका माननीय श्री सौ. आश्विनी मॅडम, सहाने सर उपस्थित होते तसेच स्कूल व कॉलेजचा सर्व शिक्षक वर्ग तसेच बाबुराव गवारे सर,अमित सर यावेळी उपस्थित होते.
सर्वांनी मुलांच्या वृक्षारोपणाच्या संकल्पनेबद्दल व कष्टा बद्दल खूप कौतुक केले व मुलांना सुद्धा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व एक चांगला आदर्श ठेवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजी गवारे सर व संस्थेचे सचिव माननीय सौ. विद्याताई गवारे मॅडम यांनी मुलांचे कौतुक केले.