“श्री समर्थ विद्यालयात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन”.

चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कुल अँड कॉलेज मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन करण्यात आले.यावेळी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचे तसेच श्री समर्थ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव बबनराव गवारे सर व श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या सचिव सौ. विद्याताई गवारे मॅडम उपस्थित होते,

पहिल्याच दिवशी गणपतीच्या सकाळच्या आरतीचे मानकरी होण्याचा मान मोशी गावाचे आदर्श व्यक्तिमत्व व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भावी नगरसेवक आणि श्री समर्थ पतसंथेचे विद्यमान संचालक श्री निलेशशेठ बोराटे यांनी मिळवला. तसेच त्यांच्या समवेत दुसरे मान्यवर श्री सादिकशेठ गवारे मोई गावाचे मा.आदर्श सरपंच उपस्थित होते. तसेच संध्याकाळच्या आरतीचा मान श्री.शिवाजीराव बबनराव गवारे सर व सौ. विद्याताई गवारे मॅडम यांना मिळाला. या आरती करिता मा.श्री. निखिल कांबळे सर व त्यांच्या पत्नी तनाया कांबळे मॅडम या दांपत्यानी 10 किलो मोदकाचा प्रसाद मुलांकरता दिला.

यावेळी विद्यालयाच्यावतीने श्री निलेशशेठ बोराटे व श्री सादिक गवारे यांचा सत्कार श्री अर्जुन जाधव सर , निखिल कांबळे सर व दिपक गवारे तसेच दयानंद पाटील यांनी केला. यावेळी सुमन गवारे मॅडम , तूषार दिघे साहेब , कुणाल दिघे साहेब , संस्थेच्या संचालिका सुनीता नाटक, रुपाली पवळे मॅम, विकास पवळे सर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अनिता टिळेकर मॅडम, सपना टाकळकर मॅडम , मोनाली मुंगसे मॅडम , शोभा तांबे मॅडम तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रमुख वर्षा दिघे , रुपाली नाकट , ललिता बडदे , तेजश्री लगड तसेच बस संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष गवारे सर , समीर गवारे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनाक्षी पाटील, वैशाली मॅडम, शितल बोबडे , अभिजीत आचेंवाड, अजित थोरात, रत्नाकर वाघमारे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रमोद रोकडे, तोटकर मामा यांनी श्रम घेतले.