श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल ची ‘सुवर्णमय’ कामगिरी

शक्ती रेसलिंग अँड क्रीडा वर्ल्ड कौन्सिल ,
वर्ड मार्शल फेडरेशन (इंडिया)
नोझोमी मार्शल आर्ट आयोजित चौथी आंतरशालेय राज्यस्तरीय शक्तीयुद्ध मार्शल आर्ट स्पर्धा रविवार दि. 28 ऑगस्ट 2022 रोजी पि.के. इंटरनॅशनल स्कूल, चाकण येथे संपन्न झाली. या स्पर्धेत खालुम्ब्रे येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत 16- गोल्ड, 11- सिल्वर तर 19- ब्रॉन्झ पदक पटकावले असून उत्तम कामगिरी केल्यामुळे विद्यालयास विशेष प्राविण्यपदक सुद्धा मिळाले असल्याची माहिती प्राचार्या मा.सौ. वंदना यादव यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शक्ती रेसलिंग अँड क्रीडा वर्ल्ड कौन्सिल, वर्ल्ड मार्शल फेडरेशन (इंडिया) नोज़ोमी मार्शल आर्ट फेडरेशनचे अध्यक्ष मा.श्री. रतनदीप सिंग कोहली व मा. सौ. कवनप्रीत सिंग कोहली तसेच शक्ती युथ अँड वूशू मार्शल आर्ट चे मा.श्री. विक्रम मराठे ,हर्ष कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्व विजयी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक मा. श्री. प्रज्वल दाभाडे सर यांचे श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव बबनराव गवारे व संस्थापिका/ सचिव मा.सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे त्याचप्रमाणे प्राचार्य मा. सौ. अनिता टिळेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी श्री समर्थ च्या पर्यवेक्षिका प्रेरणा गायकवाड,श्री. अमित पवळे सर पि.के. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सई कोहली, एंजल पब्लिक स्कूलच्या पर्यवेक्षिका सीमा कडपे समाजसेविका वसुंधरा घुले, 21मीडिया चे कुणाल दोशी आदित्य कसबे ,ओंकार जाधव इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.