“बडवे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज कडून १०,००० वृक्षरोपांचे वाटप”

महाळुंगे (चाकण) येथील उद्योग जगतातील नामांकित कंपनी असलेल्या ‘बडवे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ च्या संचालिका मा. सौ. सुप्रियाताई बडवे यांच्या संकल्पनेतून ‘झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा’ या मोहिमेअंतर्गत एक लाख झाडांची रोपे वाटण्याचा संकल्प असून आतापर्यंत दहा हजार विविध झाडांची रोपे विविध शाळांना विद्यार्थ्यांसाठी देण्यात आली आहेत.
‘बडवे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ व ‘श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज’ यांच्या सहयोगाने आज श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज च्या चिंबळी फाटा, खराबवाडी, निघोजे या शाखेतील विद्यार्थ्यांना दोन हजार रोपांचे वाटप करण्यात आले. “तापमानात झालेली वाढ, पाणीटंचाई अशा विविध संकटावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे, बडवे ग्रुपने राबविलेला हा उपक्रम पर्यावरण बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम आहे त्यांच्या या कार्याला शुभेच्छा” असे प्रतिपादन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. शिवाजीराव बबनराव गवारे सर यांनी केले. यावेळी बडवे ग्रुप चे क्लस्टर हेड मा. शशिकांत जोशी,बडवे ऑटो चे प्रमुख मा. चंद्रकांत घुले, उत्पादन विभाग प्रमुख मा. संतोष उंचे, नितीन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. बडवे ग्रुपचे मॅनेजर श्री. संदीप सोनावणे सर यांच्या प्रयत्नातून वृक्ष वाटप करण्यात आले. श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव मा. सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे ,श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या प्राचार्या मा.सौ अनिता टिळेकर प्राचार्या विद्या पवार ,प्राचार्या पल्लवी कुठे ,संचालिका सुनीता नाकट रूपाली पवळे, विकास पवळे, सपना टाकळकर, पर्यवेक्षिका अश्विनी देवकर ,शोभा तांबे, मोनाली मुंगसे,स्वाती सोनावणे, मीनाक्षी पाटील ,अजित थोरात, दीपक सहाणे,सुरज सोमवंशी, अभिजित आंचेवाड,निखिल कांबळे ,दिपाली थोरात, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप केले व त्यांचे संवर्धन करण्यास सांगितले.