कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका असताना आता टोमॅटो फ्लूने वाढवलं टेन्शन

 कोरोना आणि मंकीपॉक्सचा धोका असताना आता टोमॅटो फ्लूने टेन्शन वाढवलं आहे. हा आजार लहान मुलांमध्ये वेगानं पसरत आहे. केरळच नाही तर आता आजूबाजूच्या राज्यांमध्ये देखील याचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने अलर्ट जारी केला आहे.

टोमॅटो फ्लू संदर्भात केंद्र सरकारने काही गाइडलाईन्स देखील दिल्या आहे. लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केरळपाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू आणि ओरिसामध्येही टोमॅटो फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 82 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

यामध्ये सगळ्यात जास्त लहान मुलांचा सामावेश आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार टोमॅटो फ्लू झालेल्या रुग्णांमध्ये शरीर जड होणे, सांधेदुखी, ताप, उलट्या, त्वचेची जळजळ ही सामान्य लक्षणे आहेत. त्याची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

लहान मुलांच्या अंगावर लाल रंगाचे फोड येतात हळूहळू हे फोड वाढत जातात.

साधारण ते टोमॅटोच्या आकारासारखे होतात म्हणून या फ्लूला टोमॅटो फ्लू म्हणतात. लहान मुलांमध्ये हातपाय, तोंडाचे आजार खूप सामान्य आहेत. त्यामुळेच टोमॅटो फ्लू हा लहान मुलांना पटक होतो. हा आजार 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये होत असला तरी टोमॅटो फ्लू जा धोका मोठ्यांना देखील आहे.

या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला हा आजार होण्याचा धोका आहे. एवढंच नाही तर ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना देखील या आजाराचा धोका जास्त आहे. यासाठी सॅनिटायझेशन हा सर्वोत्तम पर्याय आहे. जर एखाद्याला हा आजार झाला असेल तर सर्वप्रथम त्याला 5 ते 7 दिवसांसाठी क्वारंटाइन करावं.

त्या व्यक्तीच्या संपर्कात कोणी येणार नाही याची काळजी घ्या. यासोबतच रुग्णाने पूर्ण विश्रांती घ्यावी आणि सोबत भरपूर द्रव पदार्थ घ्यावेत. कोमट पाण्याने त्वचेवर स्पंज लावल्याने त्वचेतील जळजळ कमी होते. पायांवर दिसणाऱ्या या लक्षणांकडे कधीच करू नका दुर्लक्ष, असू शकतात डायबेटिसचे संकेत त्यामुळे ज्या रुग्णांना हा आजार झाला आहे त्यांनी कोमट

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांना शक्यतो रुमाल वापरावा. कारण त्यांची त्वचा अधिक नाजूक असते. त्यामुळे इजा होऊ नये यासाठी ही काळजी घ्यावी. शरीराच्या ज्या भागावर फोड पडलेले आहेत त्या भागावर खाजवू नका.

मुलांचे कपडे चांगले धुवा. या दरम्यान मुलांना पौष्टिक आहार द्यावा. टोमॅटो फ्लू सारखी लक्षणं असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणतीही हयगय करू नका. कोरोना, मंकीपॉक्स आणि टोमॅटो फ्लूनं केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.