नाणेकरवाडी शाळेची विद्यार्थिनी श्रद्धा निकम जिल्ह्यात प्रथम, निकिता नळगिरे द्वितीय, राज्यपालांच्या हस्ते गौरव

चाकण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाणेकरवाडीची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा गणपती निकम हिने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित वेशभूषा या सांस्कृतिक स्पर्धेत मोठ्या गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या शुभहस्ते १५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद पुणे येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात तिलागौरविण्यात आले. तिला उपशिक्षिका सुवर्णा संदीप नाणेकर यांनी मार्गदर्शन केले
सरपंच संदेश साळवे, उपसरपंच महेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय जाधव, गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी अलका जगताप, केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर, मुख्याध्यापिका लक्ष्मीबाई दाते, सर्व शिक्षक वग्रामस्थांकडून दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले