कुरुळीत साकारली अमरनाथ शिवलिंगाची प्रतिकृती

॥ कुरुळी : प्रतिनिधी श्रावणातील शेवटच्या सोमवार निमित्त कुरुळी येथे कालभैरवनाथ मंदीरा शेजारी महादेव मंदिरात अमरनाथ येथील शिवलिंगाची प्रतिकृती साकारण्यात आली. या सजावटीसाठी शिवतांडव ग्रुपच्या कार्यकर्ते यांनी रविवारी रात्री पासूनच तयारी केली. पहाटे अभिषेक, आरती करण्यात आली. यानंतर शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण करण्यात आले. पारायण व्यासपीठ चालक म्हणून बंडोपंत गुरव यांना साथ दिली

कुरुळीत साकारली अमरनाथ शिवलिंगाची प्रतिकृती विनोद सोनवणे व महिला वैशाली बधाले, रोहिणी घाडगे, जयश्री सोनवणे, मालती जाचक, मंगल सोनवणे, बायडाबाई सोनवणे, नेहा सोनवणे, मालन सोनवणे, माधुरी कड या सर्वांनी पारायण केले. पारायणानंतर आरती करण्यात आली. कुरुळी गावातील परंपरा जपण्याचा ध्यास शिवतांडव ग्रुपने घेतला असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी शिव तांडव ग्रुप तत्पर असतो,