रेमिडेसिवीर’चे साईड इफेक्ट! दोन्ही पाय निकामी; नियमित जीम करणा-या पत्रकाराची अवस्था

नियमितपणे जिम केली… आयुष्याच्या 50 वर्षापर्यंत कधीच डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली नाही… पण, कोरोनाने गाठले. त्यात निमोनियाही झाला अन् स्कोर 23 वर गेला. ‘रेमिडेसिवीर’ इंजेक्शन, स्टेरोईड आणि औषंधाचे अधिकचे डोस द्यावे लागले. त्यामुळे कोरोनातून बाहेर आलो, खरे पण ‘रेमिडेसिवीर’चे तीव्र साईड इफेक्ट झाले. दोन्ही पाय दुखू लागले. त्यामुळे सोनोग्राफी केली तर ‘रेमिडेसिवीर’सह औषंधाचे अधिकच्या डोसमुळे रक्तश्राव बंद झाल्याने दोन्ही पाय निकामी (Rohit Kharge) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले हा प्रसंग घडला आहे पत्रकार रोहित खर्गे यांच्याबाबत….

रोहित खर्गे सांगतात, आयुष्याच्या 50 वर्षापर्यंत कधीच डॉक्टरकडे गेलो नाही. नियमितपणे जिमला जात होतो. एकदम तंदुरुस्त होतो. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची पहिली लाट आली. त्या लाटेत फिल्डवर जाऊन पत्रकारिता करत होते. अगोदर मुलाला, पत्नीला कोरोनाची लागण झाली. दोघेही पॉझिटीव्ह होते. पण, तीव्र लक्षणे नव्हती. संपर्कात आल्याने माझीही चाचणी केली तर निगेटीव्ह आली. त्यानंतर काही दिवसांनी कोरोनाने मला गाठलेच. माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. सुरुवातीला मी नॉर्मल होतो. त्यानंतर निमोनिया झाला. वायसीएमएचचे डॉ. विनायक पाटील यांनी आयसीयूमध्ये दाखल केले. तिथे उपचार सुरु होते. परंतु, निमोनिया वाढत गेला.

माझा स्कोर 23 पर्यंत गेला. आजबाजूचे लोक दगावत होते. कोरोनामुळेच दत्ताकाका साने हे गेल्याचे समजल्याने मी खूप घाबरलो, खचलो. मला व्हेटिलेंटरवरुन काढा असे डॉक्टरांना सांगत होतो. पण, माझे मित्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मला फोन आला. त्यांनी मोठा मानसिक आधार दिला. त्यांच्यासह विविध मित्रांनी आधार दिला. 23 स्कोर असताना मानसिक आधारातून मी कोरोनातून बाहेर आलो. त्यानंतर एक वर्ष मी बरा होतो. पण, आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे 19 दिवस कोरोना सेंटरमध्ये होतो. आई बरी झाली. ज्या दिवशी आईला डिस्चार्ज द्यायचा होता. त्याच दिवशी आईला झटका आला आणि तिने अखेरचा निरोप घेतला. हे दु:ख पचवत असतानाच धावपळीमुळे माझा पाय प्रचंड दुखू लागला.

आईचे विधी करुन पिंपरी-चिंचवडला (Rohit Kharge) आलो. तरी, पाय दुखायचा काही थांबत नव्हता. त्यामुळे निगडीतील डॉक्टरांकडे गेलो आणि ए-क्सरे काढला. त्यात दोन्ही पायाच्या खुब्याचा रक्तश्राव बंद झाल्याचे निदर्शनास आले. एमआर केला, त्यातही हेच निदर्शनास आले. कोरोनाच्या उपचारादरम्यान सात रेमडिसेविर इंजेक्शन, स्टेरोईड आणि औषंधाचे अधिकच्या डोसमुळे रक्तश्राव बंद झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मी पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु केले. त्याच काळात सेकंड ओपिनियम म्हणून वायसीएमचे डॉ. रुपेश पाठक यांचे मत घेतले. परंतु, संचेतीमध्ये जे सांगितले, तेच त्यांनीही सांगितले. यावर खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करु शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मी अॅडमीट झालो. डावा पाय अधिक दुखत असल्यामुळे त्याची शस्त्रक्रिया अगोदर केली. ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दुखून उजव्या पायाच्या वेदना कमी झाल्या. पण, त्याची जखम अधिक आहे.

शस्त्रक्रियेनंतर डावा पाय व्यवस्थित झाला (Rohit Kharge) आहे. एक – दोन महिन्यानंतर उजव्या पायाचे ऑपरेशन करायचे ठरले आहे. स्मोकिंग आणि ड्रिंक्स केल्याने हा आजार होते, असे डॉक्टरांनी सांगितले. पण, मी रेग्युलर जिम करणारा माणूस मला हे झाले ते फक्त जास्तीच्या ‘रेमिडेसिवीर’ इंजेक्शन, स्टेरोईड आणि औषंधाच्या मा-यामुळे… माझ्यासारखे अनेक तरुण या आजारास बळी पडले आहेत. आणि उपचार घेत आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात चांगले उपचार मिळत आहेत. त्यामुळे या आजाराला बळी पडलेल्या रुग्णांनी वायसीएममध्ये उपचार घ्यावेत असे आवाहनही खर्गे यांनी केले. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, वायसीएमचे अक्षीक्षक डॉ. राजेश वाबळे यांनी मोलाचे सहकार्य केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.