श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची स्केटिंग क्रीडा प्रकारात दर्जेदार कामगिरी

चिंबळी फाटा:- जास्तीत जास्त विद्यार्थ्यांत भारतीय संस्कृती आणि देशभक्तीबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी पारंपारिक कपडे परिधान करून तब्बल १ तास न थांबता स्केटिंग करत श्री समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल,च्या विद्यार्थ्यांनी सस्ते पाटील स्पोर्ट्स झिल अकॅडमी तर्फे आयोजित World records & Global Genius record मध्ये भाग घेऊन चमकदार कामगिरी केली.

सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षक प्रशांत तांबे सर यांचे श्री समर्थ शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्माननीय मा. श्री. शिवाजीराव गवारे सर सचिव मा.सौ.विद्याताई गवारे मॅडम व स्कूल अँड कॉलेजच्या प्राचार्या मा.सौ. अनिता टिळेकर मॅडम यांनी सर्वांचे अभिनंदन केले. संस्थेचे संचालक मा.श्री.उमेशशेठ येळवंडे,संचालिका मा.सौ.नंदाताई येळवंडे,विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मा.शोभा तांबे,प्रशिक्षक प्रशांत तांबे,शाळा प्रसिद्धी प्रमुख सुमित पवळे,सिद्धेश्वर धोंडगे या मान्यवरांनी संस्थेच्या वतीने पारितोषिक स्वीकारले व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या