“श्री समर्थ मध्ये दहीहंडीचा जल्लोष”

चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज मध्ये गोपाळकाल्याचे औचित्य साधून बालकांचा आनंद व उत्साह द्विगुणित व्हावा या उद्देशातून दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपारिक संस्कृतीचे जतन व्हावे, सणाची माहिती व्हावी, आनंदप्राप्ती व्हावी या हेतूने सदर सहशालेय उपक्रम साजरा करण्यात आला.

श्रीकृष्ण, राधा, गवळणी, यांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी यामुळे संपूर्ण शाळा गोकुळ असल्याची भासत होती. सदर उपक्रमामुळे शाळेतील चिमुकल्या गोविंदा पथकाने मानवी मनोरा रचत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव बबनराव गवारे, संस्थापिका व सचिव मा. सौ. विद्याताई शिवाजीराव गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी स्कूल अँड कॉलेजच्या प्राचार्या मा.सौ. अनिता टिळेकर, पर्यवेक्षिका शोभा तांबे, मोनाली मुंगसे, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपाली कदम व अनिता धुमाळे, शितल बोबडे, वैशाली आहिरे, माहेश्वरी पाटील, कल्याणी अडसूळ,मयुरी उपासनिस,सुरज सोमवंशी, जुई राऊत,अंकिता जाधव,शितल पाटील, स्वाती कुऱ्हाडे, पायल लांडे, प्रमोद रोकडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.