“श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, चिंबळी फाटा येथे 76वा स्वातंत्र्यदिन व अमृत महोत्सव उत्साहात साजरा.”

सोमवार दि.15 ऑगस्ट 2022 रोजी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, चिंबळी फाटा येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता प्रभातफेरी काढून करण्यात आली.शाळेतील सर्व मुलांनी प्रभातफेरीच्या वेळी भारत माता की जय,वंदे मातरमच्या जयघोषात सर्व परीसर स्वातंत्र्याच्या तीन रंगात रंगवुन टाकला .सर्वप्रथम श्री समर्थ पतसंस्था, चिंबळी फाटा येथे व त्यानंतर शाळेच्या प्रांगणात ध्वजारोहनचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री. शिवाजीराव गवारे सर आणि संस्थेच्या संस्थापिका तसेच सचिव मा. सौ विद्याताई गवारे मॅडम, पतसंस्थेचे खजिनदार संतोषशेठ गवारे, संचालक उमेश शेठ येळवंडे, संचालिका नंदाताई येळवंडे, संचालक संतोष बनकर, तसेच युवा उद्योजक चंद्रकांत गायकवाड, संस्थेचे सल्लागार हनुमंत शेठ कातोरे, सामाजिक कार्यकर्ते बबनराव गवारे , सुनीता नाकट मॅडम,चंदा पवार मॅडम,विकास पवळे सर, रुपाली पवळे मॅडम, पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे सर,प्राचार्या सौ. अनिता टिळेकर मॅडम,अर्जुन जाधव सर, प्रदीप लांडगे सर या सर्वांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपद हनुमंत शेठ कातोरे यांनी भूषवले.
कार्यक्रमाच्या वेळी सपना टाकळकर, पर्यवेक्षिका मुंगसे मोनाली,तांबे शोभा , दिपाली थोरात ,पालक प्रतिनिधी वासुदेव जैद पाटील, सांस्कृतिक विभागाच्या ललिता बडदे , डोंगरे नीलम ,दिघे वर्षा, पटले वैशाली, सपकाळ रुपाली,पाटील मीनाक्षी ,सुरज सोमवंशी, निखिल कांबळे,वाघमारे रत्नाकर, थोरात अजित , नवले मनीषा, योगिता पाटिल ,स्मिता नलगे,नाकट रुपाली, निकिता हजेरी , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री लगड मॅडम यांनी केले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत,ध्वजगीत व ध्वजप्रतिज्ञा झाली.यावेळी स्काऊट गाईड व RSP च्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांना परेडच्या माध्यमातुन मानवंदना दिली व देशाप्रती आपले प्रेम व्यक्त केले.त्यांनतर उपस्थित सर्वांच्या अंगावर शहारे आणणारे कराटेचे डेमो यावेळी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले.त्यांनतर इयत्ता 10वी व 12वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये पुढे नर्सरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे स्वातंत्र्य विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यानी नृत्य व कविताही सादर केल्या.त्यांनतर प्रा. डॉ. इंगळे मॅडम यांनी आपल्या अतिशय सुंदर अशा वकृत्वातून सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंतशेठ कातोरे यांनी यावेळी सर्वांना आपल्या भाषणातून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विधाते मॅडम यांनी केले. शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.