श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज, चिंबळी फाटा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम उत्साहात साजरे

शुक्रवार दिनांक 12/08/ 2022 रोजी श्री समर्थ विद्यालयात आपल्या भारताच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त नर्सरी ते 12 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. शिवाजीराव गवारे सर व संस्थेच्या सचिव माननीय सौ. विद्याताई गवारे मॅडम तसेच स्कूल व कॉलेजच्या प्राचार्या माननीय सौ. टिळेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्कूल मधील विद्यार्थांनी रांगोळी,चित्रकला, वेशभूषा, घोषवाक्य लिहिण्याची स्पर्धा,या सर्व स्पर्धेत उस्फुर्त सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविली.तसेच यावेळी शाळेच्या प्रांगणात सगळ्यांचे सामुहिक देभक्तीपर गीत गायन करण्यात आले.शाळेच्या विद्यार्थ्यानी अमृतमोहोत्सव निमीत्त भाषण देखील सादर केले. या कार्यक्रम प्रसंगी छोट्या विद्यार्थ्यांनी सैनिकाचा ड्रेस परिधान करून घोषणाबाजी केली तर काही विद्यार्थ्यांनी वीर क्रांतीकारकांची भूमिका साकार केली कोणी भारत माता बनले तर अनेक क्रांतीवीर बनवून सर्वांनी घोषणा दिल्या काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गायली काहींनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला तर मुलींनी उत्कृष्ट रांगोळी काढल्या स्वातंत्र्यावर आधारित स्वातंत्र्यावर आधारित एकांकिका आणि नाटके सादर केली शाळेचे सुरज सोमवंशी सर यांनी विद्यार्थ्यांना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मार्गदर्शन केले तर अजित थोरात सर यांनी देशभक्तीपर गीत गायले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अशा प्रकारे मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

सर्व स्पर्धांचे नियोजन सांस्कृतीक विभागाने केले.तसेच स्पर्धेचे परीक्षण हे लगड मॅडम वर्षा दिघे मॅडम वैशाली पटले मॅडम वर्षा जाधव मॅडम ललिता योगिता पाटील मीनाक्षी पाटील बोबडे शितल वैशाली अहिरे आम्रपाली शेळके निकिता हजेरी यांनी केले.