पुनावळे नगर आणि वेंकटेश इम्पेरिया सोसायटी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 40 रक्तदात्यांचे शिबिरात रक्तसंकलन करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या (RSS) अमृत मोहोत्त्सवी वर्षानिमित्त वेंकटेश शाखा, पुनावळे नगर आणि वेंकटेश इम्पेरिया सोसायटी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 40 रक्तदात्यांचे शिबिरात रक्तसंकलन करण्यात आले.

शिबिराचे उदघाटक सर्वश्री अक्षय मिसळे, सुनील धावारे (स्वच्छता दूत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका) ह्यांनी सर्व उपस्थित मान्यवर आणि रक्तदात्यांना स्वच्छग्राह उपक्रमाअंतर्गत स्वच्छता विषयावर प्रबोधन केले आणि सांघिक स्वच्छतेची प्रतिज्ञा पठण केली.

उपक्रमामध्ये श्री वेंकटेश शाखेतील स्वयंसेवक सर्वश्री सुमित गोखे, पुष्कराज गर्गे, लक्ष्मण कुलकर्णी, योगेश घोडे यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले. रक्तदान शिबिरास हिंजेवाडी गटाचे माननीय संघचालक राजेश जी भुजबळ, पुनावळे नगर कार्यवाह सुमेध जावळेकर, गजेंद्र शिवणे ह्यांचे मार्गदर्शन लाभले. शिबिरास अनेक गट कार्यकर्त्यांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी भेट देऊन रक्दात्यांना शुभेच्छा दिल्यात.

गरवारे रक्तपेढी, तळेगाव यांच्या (RSS) संपूर्ण टीमतर्फे रक्तसंकलन आणि इतर व्यवस्था करण्यात आली. सामूहिक पसायदान आणि रक्षकसुत्र बांधून शिबिराची सांगता झाली. आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सर्वांनी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम नक्की साजरा करूया असा संकल्प घेतला.