आकांक्षा पिंगळेने तालुक्याचा नावलौकिक वाढविला : आ. दिलीप मोहिते पाटील

पाईट:कोहिंड बुद्रुक (ताः खेड) येथील आकांक्षा पिंगळे हिला राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार जाहीर झाला आहे. ती तालुक्याच्या नावलौकीकात भर घालणारी घटना आहे. आध्यत्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या तालुक्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृध्द करणारी बाब आहे, असे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगत आकांक्षाचे कौतुक केले. ‘सुमी’ या मराठी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी

आकांक्षा हिला यंदाचा बालकलाकार पुरस्कार घोषित झाला आहे. त्याबद्दल आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते तिचा त्यांच्या राजगुरूनगर येथिल कार्यालयात सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आकांक्षाची आई सुजाता व वडील लक्ष्मण पिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते पाटील. खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, युवा नेते मयूर मोहिते पाटील, युवती अध्यक्षा आशा तांबे, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा टाकळकर, उपाध्यक्ष अमोल पिंगळे, अभिजित शेंडे, कडूसच्या उपसरपंच लता ढमाले, कैलास मुसळे, किरण कौटकर, दशरथ पिंगळे, बाळू पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, आनंदा पिंगळे सह तिचे नातेवाईक उपस्थित होते.