आळंदीत विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

आळंदीत विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

आळंदी : जिल्ह्यातील रक्ताचा अपुरा पुरवठा लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने तालुका उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे आणि आळंदी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ गव्हाणे यांच्या पुढाकारातून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दि.22 जुलैला रक्तदान शिबिर,नेत्र तपासणी शिबिर अशा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते.

राज्यातील रक्ताची मागणी वाढत असल्याने आणि रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रयत्नशील आहे नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने सामाजिक बांधिलकी जपत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवसनिमित्त ह्या समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,माजी नगरसेवक डि.डि.भोसले,प्रकाश कुऱ्हाडे,अशोकराव रंधवे,मनोजशेठ कुऱ्हाडे,रमेश गव्हाणे,सागरशेठ कुऱ्हाडे,निसार सय्यद,उमेश कुऱ्हाडे,अरिफ शेख,अमित कुऱ्हाडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या नेत्र शिबिराला 250 लोकांनी व रक्तदान शिबिराला 75 लोकांनी सहभाग नोंदवला यावेळी रोहन  कुऱ्हाडे यांनी आळंदी शहरातील नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मागील काळात देखील आम्ही अनेक सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले आहेत आता पक्षाने आम्हाला मोठी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचे भान लक्षात घेता अजून मोठ्या उत्साहाने असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.