गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ.शनिवार दिनांक 23 /7/ 2022 रोजी

खेड :  उद्या शनिवार दिनांक 23 /7/ 2022 रोजी खेड तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने , तालुक्यातील इयत्ता दहावी ,इयत्ता बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेल्या , तसेच मागील दोन वर्षातील सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा  गुणगौरव समारंभ ‘साईकृपा लॉन्स ‘ भाम ,तालुका खेड येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे .
तालुक्याचे आमदार माननीय श्री.दिलीपरावजी मोहिते पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे .

प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सहाय्यक उपायुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे माननीय गुंजाळ साहेब ,शिक्षण अधिकारी माननीय सौ.सुनंदा वाखारे मॅडम, श्री.भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी व माननीय श्री.कैलास नरहरी बवले , खेडचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री.जीवन कोकणे साहेब उपस्थित राहणार आहेत .

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय मा.सभापती श्री.रमेश नारायण पवार ,इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.तुकाराम नथुजी गवारे ,समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव बबनराव गवारे, मोई गावचे उपसरपंच विश्वनाथ शांताराम गवारे ,राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.दत्तात्रेय नामदेव येळवंडे , माननीय श्री.विश्वास नामदेव येळवंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा संघाचे पदाधिकारी माननीय श्री.शांताराम जी पोखरकर ,अध्यक्ष नंदकुमार सागर सर ,मधुकरराव नाईक सर , कार्याध्यक्ष प्रसाद गायकवाड ,सचिन हरिश्चंद्र गायकवाड ,माजी अध्यक्ष , हनुमंतराव कुबडे ,विश्वस्त, दत्तात्रेय मांजरे ,उत्तमराव पोटवडे, रामदास व्यवहारे ,संजय बोरकर हेही सन्माननीय उपस्थित राहणार आहेत.

तालुका संघाचे अध्यक्ष अंकुशराव सांडभोर ,संघाचे सचिव नवनाथ तोत्रे यांनी ही माहिती दिली .या कार्यक्रमासाठी गौरव चिन्ह माननीय श्री.शिवाजीराव गवारे,संस्थापक अध्यक्ष श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज यांनी सौजन्य दिले आहे .तर श्री.विश्वनाथ शांताराम गवारे उपसरपंच मोई यांनी सर्वांना मिष्टान्नाची व्यवस्था केली आहे.श्री.दत्तात्रेय नामदेव येळवंडे व माननीय श्री.विश्वास नामदेव येळवंडे यांनी कार्यालय उपलब्ध करून दिले आहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे .