दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त चिखली, कुदळवाडी, संभाजीनगर, पूर्णानगरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा

मोशी दि.22 : गेल्या काही दिवसांपासून चिखली, कुदळवाडी, संभाजीनगर, पूर्णानगर आदी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नियमित पुरेशा दाबाने महापालिकेने पाणीपुरवठा करावा. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होत आहे. पवना नदीची पाणीपातळी वाढली आहे. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी व्यवस्थित शुद्ध होत नाही. प्रभाग एक, दोन, बारा, तेरा आदी परिसरात दषित पाणीपुरवठा होत आहे.

अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यांना तळ मजल्यावर येऊन पाणी वाहून न्यावे लागत असल्याचे शीतल यादव यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे म्हणाले,

हंडा अथवा कळशीमध्ये साठविलेल्या पाण्याला दुर्गंधी येत आहे, तर कधी पिवळसर रंग दिसून येत आहे. भांड्यांच्या तळाशी गाळ साचून राहत आहे.

चिखली परिसरात मागील दोन ते तीन दिवसांपासून दूषित आणि पिवळसर पाणी येत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यावर त्यांनी सांगितले की, २ ते ३ दिवसांत शुद्ध पाणीपुरवठा होईल.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार
सध्या उपनगरांमध्ये दूषित पाण्यामुळे जुलाबाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांना उलटी, जुलाब होत आहेत. तसेच लहान मुलांना गॅस्ट्रो होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. हात नेहमी स्वच्छ धुवा. बाहेरील तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. बालकांची काळजी घ्यावी,