फडकेवस्ती शाळेत जिल्हा स्वच्छ विद्यालय पुरस्कार

निघोजे: फडकेवस्ती (निघोजे ता.खेड.) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस जिल्हा स्वच्छ विद्यालय पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या प्रसंगी कुरुळी केंद्राचे केंद्र प्रमुख हिरामण कुसाळकर मा.सभापती तुकाराम कुठे उपस्थित होते.

स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय अभियानांतर्गत भारत सरकारने २०२१-२२ साठी स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत जिल्हा स्तरावरील पुरस्कारासाठी फडकेवस्ती शाळेची निवड करण्यात आली. शाळेस पुरस्कार जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड,जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ.शोभा खंदारे यांच्या हस्ते देण्यात आला

पूर्वी हि शाळेस प्रेरणादायी पुरस्कार ,हरितशाळा पुरस्कार यांनी गौरविले आहे.या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे विस्तार अधिकारी अलका जगताप बेबी दरेकर ,केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,शिक्षक,ग्रामस्थांनी शाळेचे अभिनंदन केले