शाळा मान्यतेसाठी होणारी पिळवणूक थांबवा ‘मेस्टा’ संघटनेचा शिक्षण आयुक्तांकडे आग्रह

पुणे : शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे येथे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यासोबत मेस्टा संघटनेची नुकतीच बैठक झाली. अनेक विषयावर चर्चा झाली. यावेळी औरंगाबाद सह आदी संस्थाचालकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या.

नवीन शाळा मान्यता व दर्जावाढ मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर पिळवणूक होत व आहे. यात कायद्याचा अवास्तव बडगाही उगारला जात आहे. यातून शिक्षण संस्थांची सुटका करावी, असा आग्रह महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे धरला आहे.

संस्था चालकाच्या अडचणी समजून घेत प्रशासनाला मेस्टाने साथ देण्याच्या अग्रह करत प्रशासन आपल्यासोबत आहे याची ग्वाही देत भ्रष्टाचारविरहीत निकोप शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला. दर्जावाढ व नवीन मान्यता मिळवण्यासाठी स्थानिक पातळींवर होणारी पिळवणूक व कायद्याचा अवास्तव उगारला जाणारा बडगा यातून सुटका मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच नियमबाह्य काम करणार नाही परंतु नियम व अटीशर्तीचे पालन करणाऱ्या संस्थांनी न घाबरता मेस्टाच्या माध्यमातून कधीही तक्रार करा न्याय भूमिका घेऊन अन्याय करणारा अधिकारी, कर्मचारी पाठीशी घातल्याच जाणार नाही. असे सांगण्यात आले.

यावेळी मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील, लातुर जिल्हाध्यक्ष रमेश बिराजदार, उस्माबाद जिल्हा सरचिटणीस शहाजी जाधव व अकोला जिल्हाध्यक्ष साहेबराव भरणे पाटील तसेच इतरही जिल्ह्यातील व मेस्टाचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील खासगी इंग्लिश मीडियमच्या शाळा व संस्थाचालक यांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता झडी, पावसाच्या दिवसातही मेस्टा संघटनेने केले आहे. असे सांगण्यात आले. तसेच मेस्टा संघटना मजबूत करण्यास तन, मन व धनाने मदत करावी व सहयोग द्यावा. असे आवाहन यावेळी केले. कारण अजूनही विभागातील इंग्रजी शाळांचे संस्थाचालक बंधू मेस्टाचे अधिकृत सदस्य झालेले नाहीत. अशी भावना मेस्टा संघटनेच्या वतीने व्यक्त केली.

संघटनेचे दावे

‘मेस्टा’ संघटनेत एकही अनधिकृत शाळा नाही. तसेच १५ टक्के फी कपातीबाबत ज्या शाळा मेस्टा संघटनेशी संलग्न नाहीत त्यांना माफी नाही, असेही सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील खासगी इंग्लिश मीडियमच्या शाळा व संस्थाचालक यांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता मेस्टा सतत आग्रही असते, असे दावे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले