दिव्यांग होमिओपॅथी उपचार शिबिर उत्साहात संपन्न

20 जुलै : पाचवे दिव्यांग होमिओपॅथी उपचार शिबिर उत्साहात संपन्न . बैंक ऑफ़ बडोदा प्रायोजक तत्वावर सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी दिव्यांग मुलांसाठी केला संयुक्तरित्या संकल्प “
सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी पुणे यांच्यातर्फे दिनांक 20 जुलै 2022 रोजी सप्तर्षी फाऊंडेशन च्या मुख्य कार्यालयात विशेष (दिव्यांग) मुलांकरीता *मोफत पाचवे होमिओपॅथी उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. दिव्यांग मुलांचा सांभाळ करण्यामध्ये पालकांचा वेळ, ऊर्जा, पैसा व काही प्रमाणात आशा संपुष्टात आलेली असते, अशा पालकांसाठी सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी यांनी आशेचा किरण निर्माण केला आहे. ऑगस्ट २०२१ पासून सुरू केलेल्या या प्रयत्ना अंतर्गत शेकडो दिव्यांगांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून मिळाला आहे.
या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या ३० दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत उपचार देण्यात आले . या शिबिरात विशेष (दिव्यांग) मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधे देण्यात आली..विशेष म्हणजे यावेळी संस्थेने देशाच्या संरक्षनासाठी आयुष्यभर झटणाऱ्या औंध मिलेट्री स्टेशनमधील बांधवांच्या विशेष मुलांना ट्रीटमेंट व औषधे देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रायोजकत्व बँक ऑफ बडोदाचे चारही शाखा यांनी मिळून केलेले आहे.
सदर शिबिर कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केले जाते, कै.डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी 2005 साली सेवा भावातून विशेष मुलांसाठी महाबळेश्वर येथे चारिटेबल होमिओपॅथिक कॅम्पची सुरुवात केली. आज पर्यंत विजयकर सरांमुळे हजारो विशेष मुलांना निस्वार्थ भावनेतून शास्त्रशुद्ध होमिओपॅथी उपचार घेता आले आहेत.

सप्तर्षी फाउंडेशनने गेले अनेक वर्षे दिव्यांगा सोबत काम करत आहे, त्यासोबतच संस्थेच्या विविध सामाजिक क्षेत्रातील कामगिरी खालील प्रमाणे आहे.

• स्वर्ग संस्कार अभियाना अंतर्गत 500 पेक्षा अधिक बेवारस मृत व्यक्तींवर अंत्यविधी.
• शीतऋतु संरक्षण अभियानाअंतर्गत 1000 पेक्षा अधिक ब्लॅंकेट वितरण.
• दिव्यांगाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र (UDID) साठी 1500 पेक्षा दिव्यांग व्यक्तींना प्रत्यक्ष मदत.
• निरामय आरोग्य योजनेतून 3000 पेक्षा अधिक क्लेम मंजुरी.
• शेकडो दिव्यांगांना आधार कार्ड व पॅन कार्ड मिळण्यासाठी प्रत्यक्ष मदत.
• विविध आरोग्य शिबिर अंतर्गत 1000 पेक्षा दिव्यांगाच्या कुटुंबांना लाभ.
• कोरोना काळात शेकडो गरजूंना मोफत अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचे वितरण.
• दुष्काळ मुक्त मराठवाडा अभियानाअंतर्गत मराठवाड्यात जलसंधारणाचे मोठे कार्य.

शिबीराचे उद्घाटन बैंक ऑफ़ बडोदा पिंपळे सौदागर ब्रांचचे मुख्य व्यवस्थापक श्री.स्वप्निल पोतदार, प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीचे डॉ.रजत मालोकार, झेब्रा थॉट कंपनीचे मालक श्री.गणेश बोरसे, आय स्पेशल क्लिनिक चे मालक डॉ.जाधव सर, संस्थेचे संस्थापक सचिव श्री.मानोजकुमार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर शिबिरास मान्यवरांनी उपस्थित राहून सप्तर्षी फाउंडेशन सतत करत असलेल्या विविध समाजोपयोगी कार्यासाठी सप्तर्षी फाउंडेशन ला प्रोत्साहन दिले व पुढील कर्यकरिता शुभेच्छा दिल्या.
शिबिर पार पाडण्यासाठी बैंक ऑफ़ बडोदा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आवार ब्रांचचे मुख्य व्यवस्थापक श्री.अतुल चव्हाण , बैंक ऑफ़ बडोदा पिंपरी ब्रांचचे मुख्य व्यवस्थापक श्री.रितुराज सर , बैंक ऑफ़ बडोदा चिंचवड ब्रांचचे मुख्य व्यवस्थापक श्री.नितीन पाटिल, रेन्बो प्लाझाचे चेअरमन श्री.नरेश वास्वानी, ब्राइट डेंटल फाऊंडेशन चे डॉ.अभिजीत देशपांडे , मेकमाय ट्रिपचे मालक श्री.कपिल गौर . अॅड.ललितकुमार झुनझुनवाला , यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरात प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी तर्फे डॉ. रजत मालोकार, डॉ. दिप्ती मालोकार , डॉ. नीरज कुलकर्णी,डॉ.अश्विनी, डॉ.मुस्कान इत्यादी डॉक्टर उपस्थित होते.
सप्तर्षी फाउंडेशन चे संस्थापक सचिव श्री.मनोजकुमार बोरसे, सौ. रुषाली बोरसे, श्री.सचिन सुसाले, श्री.जीवन साळवे, संस्थेच्या वतीने उपस्थीत होते.
संकल्प आणि प्रकल्प राबविण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ.वैशालीताई मुळे,सचिव श्री. श्रीकांत चव्हाण व सदस्य श्री. वरून सावरे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त होते.
दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या होमिओपॅथी शिबिराची पूर्व नोंदणी सुरु झालेली असून आपण ९१७२७१६६३० या क्रमांकावर कॉल करून आपल्या पाल्याची पूर्व नोंदणी करू शकता.