फुलवडे गावातील शाळांना मोफत शालेय साहित्य वाटप.

सह्याद्री आदिवासी नोकरदार मंडळ, लय भारी महिला ग्रुप व समस्त ग्रामस्त फुलवडे यांचे संयुक्त सौजन्याने फुलवडे गावातील शाळेना दिनांक २ जुलै २०२२ रोजी खालील प्रमाणे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

  • १) जि .प .शाळा भगतवाडी , मोहरेवाडी व नंदकरवाडी या शाळेतील १ली ते ४थी च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ वहया , २ पेन , २पेन्सील ,२ खोडरबर,२ शॉपनर दिले .
  • २ ) श्रीरंग गभाले विद्यालयातील ५ ते ७वी वी च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ फुलस्केप वहया , २ पेन , २ पेन्सील , २ खोडरबर , २ शॉपनर दिले .
  • ३ ) श्रीरंग गभाले विद्यालयातील ८ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ फुलस्केप वहया , २ पेन , २ पेन्सील , २ खोडरबर , २ शॉपनर दिले .
  • ४ ) ज्ञानदीप आश्रम शाळेतील ९ वी व १० वी तील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ फुलस्केप वह्या , २ पेन , २ पेन्सील , २ खोडरबर , २ शॉपनर व ९वी आणि १०वी च्या पुस्तकांचे १० संच देण्यात आले .तसेच प्रत्येक शाळेतील

मुलांना प्रथमीक स्वरुपात जनरल नोलेजचे प्रश्न विचारण्यात आले मुलांनकडुन सकारात्मक प्रतिसाथ लाभला या प्रसंगी सह्याद्री आदिवासी नोकरदार मंडळ फुलवडे यांचे आध्यक्ष सुधीर घोटकर , सचिव मनोहर मोहरे ,उपाध्यक्ष मनोहर किसन मोहरे,सुदाम मोहरे ,मेजर नारायण हिले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

तसेच लय भारी महिला ग्रुपच्या अध्यक्षा राजेश्री मोहरे यांनी विद्यार्थ्यांना एक छानसी गोष्ट संगीतली या प्रसंगी कल्पना हिले ,शोभा मोहरे, संगिता हिले ,भिमाबाई भारमळ,नाना घोटकर,मनोहर शंकर मोहरे,प्रकाश भारमळ, डगळे, हरिचंद्र फलके आदि मान्यवर उपस्थित होते सर्व शाळेचे मुख्याध्यापक,स्टाप व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते वरील कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानदिप आश्रम शाळा नंदकरवाडी या ठिकाणी करण्यात आले होते,सर्व शाळ्याच्या वतीने संतोष बांबळे सरांनी ऋण व्यक्त केले.