गणरायाच्या आगमनाला उरले फक्त ४५ दिवस

खेड १८ : गणरायाच्या आगमनाला फक्त ४५ दिवस उरले आहेत. वाफगावमधील ऋषीराज गणेश आर्ट्स या मूर्तीकारांनी उत्सवाची तयारी सुरू केली आहे.

वाफगाव येथील ऋषीराज गणेश आर्ट्स या कारखान्यातील युवा मूर्तिकार ऋतिक कांबळे, सौ ज्योत्स्ना नानाभाऊ कांबळे यांनी शाडू मातीच्या मूर्ती साकारल्या आहेत.

येथील कारखान्यातील मूर्तींना घरगुती तसेच गणेशोत्सव मंडळ यांसकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.