शिंदे सरकारची मोठी भेट, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी, डिझेल 3 रुपयांनी स्वस्त

14जुलै : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानंतर राज्यातील तेलाच्या दरात काहीसा दिलासा मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केले की महाराष्ट्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रति लिटरने कमी करेल.

यानंतर आता महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे.