“श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज चिंबळी फाटा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.”

दि.13जुलै 2022 : श्री समर्थ विद्यालयात गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शिवाजीराव गवारे सर व विद्यालयाच्या सचिव माननीय सौ विद्याताई गवारे मॅडम तसेच स्कूल व कॉलेजच्या प्राचार्या माननीय सौ टिळेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते.

यानिमित्ताने सर्वप्रथम सरस्वती पूजनाने तसेच विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी गुरूचे महत्त्व सांगणारे वकृत्व अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले .तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यांद्वारे गुरूंना मानवंदना दिली. सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या .त्याचबरोबर विद्यालयाच्या शिक्षिका पटले मॅडम तसेच सुवर्णा मॅडम यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणारे वकृत्व सादर केले.

या कार्यक्रमाला आपल्या शाळेच्या प्राचार्या माननीय टिळेकर मॅडम या अध्यक्ष म्हणून लाभल्या. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी पर्यवेक्षिका मुंगसे मॅडम, तांबे मॅडम ,सपना मॅडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . अशा प्रकारे मोठ्या उत्साहाने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला.

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः