“श्री समर्थ विद्यालयात घुमला विठू नामाचा गजर”.

चिंबळी_०९जुलै -“श्री समर्थ विद्यालयात घुमला विठू नामाचा गजर”.

चिंबळी फाटा येथील श्री समर्थ विद्यालयात आज विठू नामाचा गजर घुमला. निमित्त होते ते बालदिंडी सोहळ्याचे. आपली संस्कृती,परंपरा विद्यार्थ्यांत रुजावी,वाढावी ,तिचे जतन व्हावे म्हणून विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा.शिवाजीराव गवारे साहेब व संस्थेच्या सचिव मा. सौ. विद्याताई गवारे शिवाजीराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले ,पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर,अशा विठ्ठलमय वातावरणात विद्यालयात रिंगण सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरले.

सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडला. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी,नृत्य,अभंग,गौळण, भजन सादर केले तर काही शिक्षक व विद्यार्थ्यांनी फुगडी घालून दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला. दिंडी सोहळ्याचे नियोजन नर्सरी ते इ.१२वी पर्यंतचे सर्व शिक्षक वृंद व विद्यालयातील सांस्कृतिक विभाग यांनी उत्तमरित्य केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजच्या प्राचार्या मा. सौ.अनिता टिळेकर मॅडम ,डॉ. इंगळे मॅडम, रुपाली पवळे ,नाटक सुनीता ,समर्थ स्कूलचे पालक,इंजिनीयर इंगळे सर उपस्थित होते.त्याचबरोबर पर्यवेक्षिका मोनाली मुंगसे,शोभा तांबे,,सपना टाकळकर, नाकट रूपाली, नवले मनीषा,गोंदील प्रिंयंका,विधाटे स्नेहल,योगिता पाटील,सपकाळ रुपाली,कोकणे रुपाली,पटले वैशाली,डोंगरे नीलम, , ललिता बडदे, तेजश्री लगड,संतोष गवारे , अजित थोरात, ,सुरज सोमवंशी, मयुरी उपासने ,मीनाक्षी पाटील, आम्रपाली शेळके ,अहिरे वैशाली,बोबडे शीतल ,निखिल कांबळे,इत्यादी शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नलगे यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा दिघे यांनी केले.

भारत स्काऊट – गाईड च्या विद्यार्थ्यांकडू स्वच्छता मोहीम
श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, श्री समर्थ बस संघटना यांच्या सहयोगातून विद्यालयांतर्गत चालविण्यात येत असलेल्या भारत-स्काऊट-गाईडच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारी निमित्त मागील आठवड्यात वारकरी भाविक भक्तांना फराळाचे वाटप करून परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.