श्री.नारायण विष्णू धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचा जीवनपट

श्री.नारायण विष्णू धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी

यांचा जन्म : १ मार्च १९२२ रोजी रेवदंडा येथे झाला. नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले.रेवदंड्याच्या शाळेत ते शिकत होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हात पाहून भविष्य सांगणे होता.

धर्माधिकारी या घराण्यात चारशे वर्षापासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे.त्यांच्या घराण्याचे मुळचे अडनाव “शांडिल्य” असे होते. त्यांच्या भूतकाळात आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शांडिल्य हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे, त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांन सन्मानाने ‘धर्माधिकारी’ अशी पदवी दिली. तेव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनाव लावत आले त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आहो.

डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन प्रसिद्धीपासून दुर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले.. त्यांचे चिरंजीवी पद्मश्री डॉ. श्री.दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे.

 

धर्माचरणाविषयी बोलतांना,त्या अनुषंगाने समाजाला | सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निरविकारी सामर्थवान समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्कामपणे त्यांचे सुपुत्र आदणीय पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकरी व नातू आदरणीय रायगड भूषण श्री.सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत.

 

श्री समर्थ बैठक या कामासाठी त्यांनी १९४३ साली | रायगड जिल्हयातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या माध्यमातून सोमवार दिनांक ८ ऑक्टोबर १९४३ (विजयादशमी) रोजी मुंबई येथील गोरेगांव येथे प्रथम श्री बैठक सुरु करण्यात आली. या संस्थेव्दारे येथे जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत.

त्या संस्थेमध्ये आजघडीला मराठी बरोबर हिंदी, उडिया, तमिल, बंगाली, कन्नड व इंग्रजीतून निरूपण केले जाते. सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली.

अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्व पटवून दिले होते. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातिभेद अशा क्रूरप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सदगुणांची पेरणी केली. त्यामुळे लाखो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.

श्री.नानास्वारींना मिळालेले पुरस्कार.

 • 1) इ.स २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै.नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 • 2)गुजराती महाजन भूषण पुरस्कार (१७ नोहेंबर २०००)
 • 3) जिल्हापरिषदेतर्फे रायगडमित्र (२३ में १९९३)
 • ४) त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले होते (२८जानेवारी २००५).
 • 5)पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे मानपत्र (१२ मे २००३)
 • 6)पुणे महापालिकेतर्फे मानपत्र.
 • 7)पुण्याचा महर्षी व्यास प्रतिष्ठानचा, महर्षी व्यास पुरस्कार ( खोपोली, ११ डिसेंबर २००७).
 • 8)महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार (१ मार्च 2002).
 • 9)महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (३० ऑगस्ट 2000).
 • 10)महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२९ जून १९९७)
 • 11)रायगड भुषण.
 • १२) राष्ट्रीय एकात्मता कार्याबद्दल, सीरॉक (इंडिया) ठाणे यांचा ‘सीरॉक इंडिया’ पुरस्कार (२६ मे १९९९).
 • 13)शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार (3१ जानेवारी 2003).
 • 14)समर्थ व्यासपीठ, पुणेतर्फे शिवसमर्थ पुरस्कार (१५ नोहेंबर १९९९)
 • 15)समर्थ रामदास स्वामी भूषण पुरस्कार (१८ मे १९९९ )

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचे निधन ८ जुलै २००८ रोजी झाले ..!

-संकलन कु.नेहा पवार