सर्वसामान्यांसाठी सर्वज्ञ पॅथॉलॉजी सर्विसेस आपल्या परिसरात उपलब्ध

पिंपरी चिंचवड _3 जुलै 2022_ रोजी पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वज्ञ पॅथॉलॉजी सर्व्हिसेस चे उद्घाटन करण्यात आले. याचे उद्घाटन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष-श्री.शिवाजीराव बबनराव गवारे व सचिव-सौ.विद्याताई शिवाजीराव गवारे तसेच केया डायग्नोस्टिक सेंटर चे डॉक्टर नितीन जाधव ,माऊली डायग्नोस्टिक सेंटर चे डॉक्टर वरून ठाकूर चाकण नगर परिषदेचे अध्यक्ष-श्री प्रकाश भुजबळ, सुभाष भुजबळ, डॉक्टर धनंजय भुजबळ श्री वसंत टिळेकर श्री समर्थ स्कूलच्या प्राचार्य अनिता टिळेकर ,निखिल भुजबळ राजेंद्र आल्हाट ,बबनराव गवारे ,सुमन ताई गवारे ,निकिता भुजबळ ,महेश कुडके, तेजश्री आल्हाट ,सारिका अभंग ,हनुमंत करपे, तुषार करपे विशाल आहेर ,अरविंद करपे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

                       सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे .यासाठी वेगवेगळ्या टेस्ट डॉक्टरांकडून करण्यास सांगितल्या जातात. त्याकरिता पेशंटला परवडेल व लवकर रोगाचे निदान होईल यासाठी तसेच गरोदर महिला विकलांग व्यक्ती वयोवृद्ध व्यक्तीसाठी होम व्हिजीट ची सोय केलेली आहे. या सर्व सोयी आपणासाठी लाईफ सेल व सर्वज्ञ पॅथॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वज्ञ पॅथॉलॉजी सर्विसेस आपणासाठी तीन जुलै दोन हजार बावीस पासून कार्यरत आहे ही पॅथॉलॉजी चिखली येथील साने चौक शॉप नंबर सहा केया डायग्नोस्टिक सेंटर, सेक्टर 20 ,चिखली पुणे 411019 येथे आहे कुमार अनिकेत वसंत टिळेकर या होतकरू तरुणाने शिक्षण सुरू असताना लॅबोरेटरी चा कोर्स पूर्ण केला व नोकरी न करता मोठा उद्योजक बनता येत नसेल तर छोट्या व्यवसायापासून व्यवसायाला सुरुवात केली आणि या पॅथॉलॉजी सर्व्हिसेस चे उद्घाटन केले.

केया डायग्नोस्टिक चे डॉक्टर नितीन जाधव यांनी उपस्थितांना हॉस्पिटलच्या सोयीसुविधांची माहिती दिली तसेच श्री माऊली डायग्नोस्टिक चे डॉक्टर वरून ठाकूर यांनी मोशी येथील त्यांच्या डायग्नोस्टिक सेंटरची माहिती दिली या सर्वांनी गरीब लोकांना नेहमीच मदत केलेली आहे व इथून पुढे ही आम्ही हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी च्या सर्विसेस माफक दरात रुग्णांसाठी उपलब्ध करून देऊ अशी माहिती दिली हे दोन्ही हॉस्पिटल महिलांसाठी वरदान आहे या ठिकाणी सोनोग्राफी पॅथॉलॉजी एक्स-रे या सोयी आहेत अनिकेत टिळेकरणे कोविंड नाईन्टीन साठी rt-pcr ही टेस्ट होम व्हिजीट द्वारे उपलब्ध करून दिलेली आहे तसेच खूप सार्‍या टेस्ट पॅकेजेस मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत या उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार टेक्निशियन अनिकेत टिळेकर यांनी मानले.