“प्रदूषणापासून मुक्तता” ह्या मोहिमे अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर – ई मोबीलिटीच्या विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

“प्रदूषणापासून मुक्तता” ह्या मोहिमे अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर – ई मोबीलिटीच्या विद्यमाने एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा

दिनांक २८ जून २०२२ रोजी पुणे येथे आयोजित केली होती. ह्या कार्यशाळेला महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून सीएससी चे १७० व्हीएलई उपस्थित होते.

कार्यशाळेला मार्गदर्शन करण्याकरिता सीएससी ई मोबीलिटी चे प्रमुख श्री.गौरव चौधरी सर, महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री.वैभव देशपांडे सर(सीएससी), राज्य सहायक श्री.समीर पाटील सर, मनजर श्री.मुकेश शर्मा सर ह्याच बरोबर ई मोबीलिटी मध्ये सहभागी असलेले एस्कॉर्ट ट्रॅक्टर कंपनीचे बिझनेस हेड, टाटा कमर्शिअल, महिंद्रा इलेक्ट्रिक, पिएजिओ आणि तूनवाल इलेक्ट्रिक ह्या कंपनीच्या प्रतिनिधींनी सुध्दा उपयुक्त मोलाचे मार्गदर्शन केले.

वरील सहभागी झालेल्या कंपनीने आपले मुख्य मॉडेल्स व्हीएलई च्या माहिती करिता दर्शनी भागात ठेवले होते. कार्यशाळेचा मुख्य उद्देश व्हीएलई मार्फत शेतकरी, लघुउद्योग आणि सामान्य नागरिकांना दळण वळणा करिता लागणाऱ्या उच्च दर्जाचे प्रदूषणमुक्त परिवहन आणि शेतकऱ्यानं लागणारे ट्रॅक्टर मुबलक किंमतीत सहजपणे उपलब्ध कसे करता येतील ह्याचे योग्य नियोजन करण्याचे होते.

सदरील कार्यशाळेत उपस्थित असलेले व्हीएलई उपयुक्त मार्गदर्शन व नवीन उद्योग मिळाल्याने सीएससी चे आभार मानत होते.